सिंदेवाही प्रवासी निवाऱ्यात कुत्र्याचा बस्तान

58

सिंदेवाही प्रवासी निवाऱ्यात कुत्र्याचा बस्तान

आता पर्यंत या कुत्र्यानी 8 जणांना केले चावा घेऊन गंबीर जख्मी

अमान क़ुरैशी
सिंदेवाही प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही :- सिंदेवाह शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढू लागली आहे. शहरासह सिंदेवाही बस स्थानकात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सिंदेवाही शहरातील बस स्थानकात मोकाट कुत्र्यांचा अधिक वावर पाहायला मिळत आहे.
याच बस स्थानकात आणि शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर मोकाट कुत्र्यांनी अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांना चावा घेतला आहे।

शहरासह तालुक्यातील अनेक गल्ली मोहल्यात सध्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे.
मोकाट कुत्र्यामुळे शहरवासीय हैराण झालेले आहेत.
मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक व प्रवासी करत आहे.
शहरातील मुख्य मार्ग असो, बाजारपेठ असो किंवा गल्ली बोळातील रस्ते असोत मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात दिसतात. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मागे धावणारे कुत्रे असो किंवा बाजारपेठ शाळा महाविद्यालयाच्या परिसरात फिरणारी मोकाट कुत्रे असो, यामुळे सिंदेवाही शहरवासीय चांगलेच हैराण झाले आहेत. आतापर्यंत या कुत्र्यांनी 8 जणांचा चावा घेतला आहे. नगरपंचायत व महामंडळने अशा कुत्र्यांना पकडूंन तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी व सुजान नागरिकांकडून करण्यात येत आहे.