केंद्र शासनाच्या पी.एम. ई-बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध
✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की केंद्र शासनाच्या पी.एम. ई-बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे पी.एम. ई-बस योजनेचा पहिला मान नागपूर महानगरपालिकेला मिळणार असून मे २०२५ मध्ये मनपाला ४० ई-बसेस प्राप्त होणार आहे. केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली येथून आलेल्या पथकाद्वारे शुक्रवारी (ता.१४) कामाची संयुक्त पाहणी करण्यात आली. सर्वप्रथम त्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेतली.
या पाहणीत केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली चे डेप्यूटी टिम लिडर श्री. राम पौनिकर, वरीष्ठ परिवहन नियोजक श्री. अमनदिप कुमार, सल्लागार श्री. शर्मा, जेबीएम कंपनीचे श्री. कल्याण रेडडी, सी.इ.एस.एल. व बस पुरवठाकार, परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री. रवींद्र पागे, व्यवस्थापक (प्रशासन) श्री. विकास जोशी, व्यवस्थापक (ऑपरेशन) श्री. राजीव घाटोळे, उपअभियंता श्री. केदार मिश्रा, यांत्रिकी अभियंता श्री. योगेश लुंगे, विद्युत अभियंता श्री. प्रशांत काळबांडे, राजस्व निरिक्षक श्री. समिर परमार उपस्थित होते.