बल्लारपुर वर्धा नदीत पाय घसरून 12 वर्षीय चिमुकलीचा मृत्यु.

70

बल्लारपुर वर्धा नदीत पाय घसरून 12 वर्षीय चिमुकलीचा मृत्यु.

मैत्रणीचा वाढदिवसाच साजरा करण्यासाठी गेली होती नदीवर.

12-year-old Chimukali dies after slipping in Ballarpur Wardha river.

सौ.हनिशा दुधे
बल्लारपुर तालुका प्रतिनिधी
बल्लारपुर,दि.16 मार्च:- शहरातील गणपती विसर्जन घाट एक पर्यटन स्थळ बनले असून या ठिकाणी दिवसभर नागरिकांची रेलचेल असते मात्र आज याच ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आज दुपारी 3:00 वाजताच्या सुमारास तीन मैत्रिणी वाढदिवस साजरा करण्यासाठी वर्धा नदीच्या गणपती घाटावर गेले असता संजना धुर्वे हिचा वाढदिवस साजरा करून केक खाल्यावर आपले हात धुण्याकरिता नदीवर गेले असता एका 12 वर्षीय मुलीचा पाय घसरून पाण्यात बुडाली असल्याचे वृत्त आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार संजना गजानन धुर्वे वय – 21 वर्ष रा साईबाबा वॉर्ड, रविना आत्राम (20) श्रीराम वॉर्ड, अक्षरा बबन सोनटक्के (12 ) वर्ष, या दोघी केक खाल्लेले हात धुण्यासाठी नदी किनारी गेले असता पाय घसरून अक्षरा बबन सोनटक्के ही 12 वर्षीय अक्षरा बबन सोनटक्के रा. साईबाबा वॉर्ड बल्लारपूर व बालाजी हायस्कुल बामणी येथे 7 व्या वर्गात शिकणारी हुशार व होतकरू मुलगी पाण्यात बुडाली सदर घटनेची माहिती या दोन्ही मुलींनी त्वरित पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले व शोधमोहीम सुरू केली आहे सदर वृत्त कळताच या वर्धा नदी किनारी असलेल्या किल्ला नगर वॉर्ड वासीयांनी लगेच धाव घेतल्याचे वृत्त होते.