15 वर्षाचा नाबालीक मुली बरोबर 9 दिवस 18 नराधमांनी केला सामुहिक बलात्कार.
15 वर्षाची तरुणी शारीरिक त्रासाने प्राण पणाने ओरडायची पण आरोपी तिला सोडायला तयार नव्हते. सामूहिक बलात्काराचा तपास करताना पोलिसही हळहळले.
✒️मिडीया वार्ता न्यूज क्राईम रिपोर्टर ✒️
राजस्थान,दि.16 मार्च :- च्या कोटा जिल्ह्यात एक सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. त्यामुळे संपुर्ण राजस्थान हादरल आहे. पीढीत ही 15 वर्षाची नाबालीक तरुणी असुन. या तरुणीच्या ओळखीच्या दोघांनी तिचे अपहरण केले. यानंतर सलग नऊ दिवस रोज वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या दोघांसह एकूण 18 नराधमांनी या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे.
आज देशात महिला अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज देशात कुठेही महीला सुरक्षित नाही आहे. असे चित्र सर्वीकडे दिसून येत आहे.
कोटा जिल्हात एक तरुणी अपहरण करुन सतत 9 दिवस तिच्या बरोबर 18 नराधामानी सामुहिक अत्याचार केला.
तरुणी शारीरीक त्रासाने प्राण पणाने ओरडायची त्यांच्याकडे सुटकेसाठी याचना करत होती. मात्र, नराधम आरोपी तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करत राहिले. अखेरीस या तरुणीने कशीबशी आरोपींच्या तावडीतून आपली सुटका करुन घेतली. यानंतर तिने थेट पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी या प्रकरणी चार अल्पवयी आरोपींसह 20 नराधमांना अटक केली आहे.
या समुहिक बलात्काराची पोलिस तपास करत असतांना ते पण त्या नराधमांची हैवानीयत पाहुन हळहळले आहे.