Bharatiya Janata Party Chandrapur Adivasi Morcha celebrates the birth anniversary of Krantiveer Shahid Puleshwar Shedmake.
Bharatiya Janata Party Chandrapur Adivasi Morcha celebrates the birth anniversary of Krantiveer Shahid Puleshwar Shedmake.

भारतीय जनता पार्टी चंद्रपुर आदिवासी मोर्चा तर्फे क्रांतिवीर शहिद पुलेश्वर शेडमाके जयंती उत्साहात साजरी.

आदिवासी मातांना साडी-चोळी चे वाटप व सफाई कामगारांचा सत्कार

महानगर भाजपाच्या आदिवासी मोर्चाचा उपक्रम

महानगर अध्यक्ष डॉ गुलवाडे व महापौर कंचर्लावार यांनी वाहिली आदरांजली

Bharatiya Janata Party Chandrapur Adivasi Morcha celebrates the birth anniversary of Krantiveer Shahid Puleshwar Shedmake.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- येथील भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपुर अंतर्गत येणाऱ्या आदिवासी मोर्चा तर्फे क्रांतिवीर शहिद पुलेश्वर शेडमाके यांच्या जयंतीचे निमित्य साधून नगरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रामुख्याने आदिवासी मातांना साडी-चोळीचे वाटप व मनपा सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचा समावेश होता.भाजपाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी जिल्हा कारागृह परिसरातील शाहिद भूमीवर जाऊन शहिद पुलेश्वर शेडमाके यांना भाजपाच्या वतीने मंगळवार (12मार्च)ला आदरांजली अर्पण केली.जलनगर येथील कार्यक्रमात आदिवासी मातांना साडीचोळी व सफाई कामगारांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे व महापौर राखी कंचर्लावार यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी मनपा सभापती रवी आसवानी, भाजपा(श)कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष धनराज कोवे, नगरसेविका शीला चव्हाण, चंद्रकला सोयाम, भाजपा नेते रवी लोणकर, रामकुमार अका पेलीवार,माया उईके, शितल कुळमेथे, सचिन कोतपल्‍लीवार, सुरेश तालेवार, राजेंद्र खांडेकर, राहुल धोटेकर, राहुल पाल, गणेश गेडाम, दयालाल कन्नाके, रवी मेश्राम, शुभम गेडाम, हेमंत मरस्कोल्हे, बंटी गेडाम, भैय्याजी उईके, कृष्‍णा मसराम, तृष्णा गेडाम, कोमल राजगडकर, अरुणा मरस्कोल्हे, रोहित मडावी, ज्योती गेडाम, अरविंद मडावी, विठ्ठल कुमरे यांनीही शहिद पुलेश्वर शेडमाके यांना आदरांजली अर्पण केली.

यावेळी,डॉ गुलवाडे म्हणाले,शहिद पुलेश्वर शेडमाके यांचा आदर्श समाजाने जोपासला पाहिजे.शाहिद-क्रांतिवीर हे समग्र समाजाचे असतात.कारागृहाचा हा परिसर शहिदभूमी आहे.येथील मातीचा टिळा कपाळावर लावून अन्याय विरुद्ध आवाज उठवला पाहिजे.समस्त भारतीय जनता पार्टी ही आदिवासी समाजाच्या सोबत उभी आहे.माजी वित्तमंत्री,आ सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना शहिद शेडमाकेंच्या बलिदानाची जाणीव असून त्यांचे विशेष प्रेम या समाजावर आहे.म्हणूनच अनेक समाजपयोगी उपक्रम दोघांनी राबविले. ज्यात प्रामुख्याने शहिद स्मारकाचे सौंदर्यीकरण,क्रांतिवीर शहिद पुलेश्वर शेडमाके यांचे नावे स्टेडियम, टपाल तिकीट, आदिवासी विद्यार्थ्यांना हिमालय सर करायला लावणे,मुलींसाठी वसतिगृह बांधणे आदींचा यात समावेश असल्याचे ते जलनगर येथील कार्यक्रमात बोलतांना म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तविक करतांना धनराज कोवे यांनी, येथील जिल्हा कारागृह गोंडराजांचा राजमहल असल्याने तो मुक्त करावा व आदिवासी संस्कृतीचे जतन करावे अशी मागणी केली. शरद कांबळे यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी नगरसेवक शीतल आत्राम, किशोर आत्राम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात जलनगर परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here