स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे जाणाऱ्या रोडवरील खड्डे पडल्याने डांबरीकरणाचे काम कधी पुर्ण होणार याकडे ग्रामवायीयांचे लागले लक्ष.
रोडचे डांबरीकरण तात्काळ न केल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा- मंगी (बु) चे उपसरपंच वासुदेव चापले.
संतोष मेश्राम, राजुरा तालूका प्रतीनिधी
राजुरा:- स्मार्ट ग्राम पंचायत, मंगी (बु) म्हणून नावारुपाला येत आहे. ग्रामीण संस्कृतीची जोपासना, संत परंपरेची जोपासना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या बाबीमुळे गावातील नागरीक अनेक आव्हाणांना तोंड देत विकासाचे नवनवीन किर्तीमान स्थापन करीत आहे. गावातील नालीमुक्त पण शोषखड्डेयुक्त गाव, प्लॅस्टीक मुक्त, व्यसनमुक्त तसेच सौंदर्याने नटलेले हे या मंगी (बु) गावाचे वेगळेपण. या गावाला येण्यासाठी चंदनवाही येथून यावे लागते. अडचण ही आहे की चंदनवाही ते मंगी (बु) पर्यंत रोडवर बरेचा खड्डे पडलेले आहे. गाव तर स्मार्ट आहे पण रोड मात्र उखडलेले आहे. मंगी या स्मार्ट गावाला भेटी देणार्यांची संख्या पण वाढली आहे. खड्यावरुन प्रवास करणे किती जिकरीचे आहे हे त्यावरुन प्रवास करणार्यानांच कळते. ग्रामीण जनता किती किती सहन करावे याला मर्यादा नाही. लोकप्रतिधींचे याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. हा रोड डांबरीकरणासाठी मंजूर आहे पण काम केव्हा होणार याची मंगी (बु), मंगी (खु), खैरगुडा, रांजीगुडा, उपरवाही, भुरकुंडा इत्यादी गावांना बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षा आहे. ही प्रतिक्षा आम्ही गावकरीच संपवण्याचा निर्धार केलेला आहे. काम करा अन्यथा आंदोलनाचा मार्ग आम्ही निश्चित केलेला आहे. अधिकाऱ्यांनी तात्काळ कामाला सुरुवात करावी. असा इशारा मंगी (बु) ग्राम पंचायतीचे उपसरपंच वासुदेव चापले यांनी दिलेला आहे. सर्व गावकऱ्यांचे लक्ष चंदनवाही ते मंगी (बु) रोडच्या डांबरीकरणाकडे लागलेले आहे. डांबरीकरण लवकरात लवकर व्हावे..