वणा नदीवर बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे उदघाटन.
या उड्डाण पुलाला देण्यात आले संत शिरोमणी गाडगे बाबाचे नाव.
हिंगणघाट तालुक्याचे समाजसेवक आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते सीतारामजी भुतेने केले उदघाटन.
✒प्रशांत जगताप प्रतिनिधी✒
हिंगणघाट:- वणा नदीवरील तरोडा मार्गावरील उड्डाण पुलाचे नाव येथील जनतेच्या मागणीमुळे वैराग्यमुर्ति संत शिरोमणी गाडगेबाबा महाराज करण्यात यावे. अशी मागणी हे गावकरी माघिल अनेक दिवसांपासून करत होते. सदर ही मागणी पुर्णत्वास आली असुन दि. 11 मार्च ला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर संत शिरोमणी गाडगे बाबा उड्डाण पुलाचा उद्घाटन सोहळा हिंगणघाट-समुद्रपुर- सिंदी रेल्वे विधानसभा मतदार क्षेत्रातील समाजसेवक आणि जेष्ठ शिवसेना नेते सीतारामजी भुते यांचा हस्ते पार पडला. यावेळी उदघाटनाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
हिंगणघाट येथील मसानभुमी जवळुन जाणा-या वणा नदीवर पुल अनेक दिवसा बांधण्यात आला होता. पण प्रशासनाचा उदाशीनतेमुळे उड्डाण पुल सुरु होत झाला नाही. त्यामूळे सीताराम भुते आणि स्थानिक नागरीकाच्या पुढाकाराने हा उड्डाण पुलाचे नामकरण आणि उदघाटन करण्यात आले. यावेळी शंकरराव झाडे, समाजसेवक श्याम ईडपवार, सुनील आष्ठीकर, संजय आत्राम आदी मान्यवराच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या उड्डाण पुलाला संत शिरोमणी गाडगे बाबा नाव दिल्याने हिंगणघाट तालुक्यातील सर्व लोकांनी आनंद व्यक्त केला. कारण अनेक लोकांची ही मागणी आज पुर्ण झाली.