डोक्यात दगड घालून तरुणीची हत्या. अहमदनगर मधिल राहुरीची घटना.
✒️अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी✒️
अहमदनगर,दि.16 मार्च:- जिल्हातील राहुरी येथे एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका तरुणीच्या डोक्यात दगड घालुन तिची हत्या करण्यात आली आहे. त्यामूळे या परीसरात लोकांत भीतीचे वातावरण दिसून येत आहे.
डोक्यात दगड घालून तरुणीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना राहुरी फॅक्टरी परिसरातील गुंजाळ नाका येथे सोमवारी मध्यरात्री उघड झाली आहे. दरम्यान, या तरुणीचा चेहरा विद्रूप करण्यात आल्याने तिची ओळख पटू शकलेली नाही.
श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक मधुकर शिंदे, उपनिरीक्षक नीलेश वाघ, हेड कॉन्स्टेबल दिनेश आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पंजाबी ड्रेस घातलेल्या मयत तरुणीच्या अंगठ्याजवळ इंग्रजी शब्दात ‘शीतल’ हे नाव गोंदलेले आहे. खुनासाठी वापर झालेला दगड पाहता मारेकरी एकापेक्षा जास्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राहुरी पोलिसांनी पंचनामा करून मृत्युदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्या नंतर या हत्येची उकल हौऊ शकते अशी माहीती पोलिसांनी दिली.