कल्याण डोंबिवली महानगर पालीकेच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी 15 हजाराची लाच घेताना अटक.

60

कल्याण डोंबिवली महानगर पालीकेच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी 15 हजाराची लाच घेताना अटक.

 Two officials of Kalyan Dombivali Municipal Corporation arrested for accepting bribe of Rs 15,000 in construction case.

✒राजु मोरे प्रतिनिधी✒
ठाणे, दि.16 मार्च:- कल्याण डोंबिवली महानगर पालीकेत आज मोठ्या प्रमाणात भष्टचाराची किड लागली आहे. केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी 15 हजार रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. यामध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि त्यांचे सहकारी सुहास मढवी यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा परिसरात राहणाऱ्या एका सर्वसामान्य नागरिकाचे घराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या सर्व सामान्य नागरिकाकडे 20 हजार रुपायांची मागणी केली. त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला. अखेर 15 हजार रुपये देण्याचे ठरले. हेच पंधरा हजार घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रभाग अधिकारी कार्यालयात दोघांना रंगेहाथ पकडले.