अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत दोन एकरातील उस संपूर्ण जळून खाक.
✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078
हिंगणघाट : तालुक्यातील निंधा (टाकळी) येथील शेतकरी किरण लोंढे यांच्या शेतामध्ये असलेल्या उसाला अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत दोन एकरातील उस संपूर्ण जळून खाक झाला आहे, त्यामध्ये शेतकरी लोंढे यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
टाकळी (निंधा) येथे शिवपांदन रस्त्यालगतच किरण लोंढे यांचे चार एकर शेत आहे त्यामध्ये त्यांनी दोन एकरामध्ये उसाची लागवड केली होती परंतु मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास शेतशिवारामध्ये कोणीही दिसुन येत नसल्याचे आढळले असता एका अज्ञात इसमाने आग उसाच्या मळ्याला आग लावली यामध्ये दोन एकरातील संपूर्ण उस व ओलितासाठी ठेवण्यात आलेले स्पिंकलर पाइप हि जळून खाक झाले. यावेळी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची चौकशी करून पंचनामा करून घेतला. पुढिल तपास पोलीस करित आहे.