आलेवाही येथे कलापथकाद्वारे जंगलात वनवा व संघर्ष याबाबत जनजागृती

आलेवाही येथे कलापथकाद्वारे जंगलात वनवा व संघर्ष याबाबत जनजागृती

आलेवाही येथे कलापथकाद्वारे जंगलात वनवा व संघर्ष याबाबत जनजागृती

✒सागर अलोने✒
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
96375 65247

सिंदेवाही :–तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील आलेवाही बीट येथे आज पटनाट्य द्वारा जंगल व परिसरातील जंगल वाचवा ल वन्यजीव संरक्षण या बद्दल मार्गदर्शन कलापथकाद्वारे करण्यात आले.

माहिती व जनसंपर्क कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित व सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या वतीने हे पटनाट्य, कलापथक द्वारे समाज प्रबोधनाचे कार्य करन्यात आले. यात जंगलाजवळ जंगल परिसरात वावरताना गावातील लोकांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी. वन विभागाला सहकार्य करून जंगला सोबत जोडून जगायला हवे. याबाबत आपला पटनाट्य म्हणजेच कलापथकाद्वारे प्रबोधन केले.

तळोधी वनपरिक्षेत्रातील आलेवाही गावात या कलापथक द्वारे केलेल्या सादरीकरण वेळेस आलेवाही बीटाचे प्रभारी वनरक्षक एस. बी. पेंदाम, स्वाब नेचर केअर संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, आलेवाही चे पोलीस पाटील, सरपंच व आलेवाही चे समस्त गावकरी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाकरिता पि. आर. टि. सदस्य आलेवाही, वन चौकीदार, ऊईके, वन मजूर रामदीन, सचिन रामटेके, यांनी सहकार्य केले.