जागतिक महिला दिवस व महिला मेळावा आयोजनात sveep अंतर्गत मतदार जागृती शपथ कार्यक्रम
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
उमरेड :- नांद (भी). जागतिक महिला दिवस व महिला मेळावा आयोजनात sveep अंतर्गत मतदार जागृती शपथ हा कार्यक्रम काल दि 15 रोजी ग्रामपंचाय पातळीवर राबविण्यात आला. तालुक्यात महिला पुरुष मतदाना मध्ये दहा फरक असलेल्या बूथ ठिकाणी महिलांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. इतर देशात महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला परंतु भारतात मात्र हा अधिकार देशाच्या संविधानाने सविधान अमलात आल्याबरोबरच दिला आहे. तेव्हा ह्या अधिकाराचा वापर लोकशाही समृद्ध करण्यासाठी करण्याचे आव्हान तालुका स्वीप नोडल अधिकारी यांनी केले. सदर कार्यक्रमाला गट विकास अधिकारी डॉ.जाधव पंचायत समिती सभापती माधुरी देशमुख ,जिल्हा परिषद सदस्य नियमावली ,उपसभापती राहुल मेश्राम , सहाय्य गट विकास अधिकारी विजय जिडगिलवार ,सरपंच ग्रामपंचायत शीतल राजूरकर ,उपसरपंच मोहन भाऊ धारणे,व सर्व ग्रामपंचायत महिला व पुरुष सभासत या कालच्या कार्यक्रमाला उपस्थित होते कालच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत नांद अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षिका तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यशोधक समाजाच्या वंदनाताई बनकर यांनी काल महिलांमध्ये असलेल्या अंधश्रद्धा अज्ञान या विषयावर माहिती दिली.