सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

🖋️ मिडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 16 मार्च
मुस्लिम समाजाची सामाजिक आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती अनुसूचित जाती व जमाती पेक्षाही स्थिती खालावलेली आहे, असे सच्चर समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासना तर्फे धोरणात्मक निर्णय घेण्यात यावे व मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या विकासाठी बार्टी, महाज्योती व सारथी स्वायत्त संस्था स्थापन करावा अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथील तहसिलदार प्रिया कवळे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

के.जी टु पी.जी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती देण्यात यावी, दहावी बारावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप देण्यात यावी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थयाांना राज्य शासनाच्या वतीने मोफत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, पी.एच. डी. करण्यासाठी दरवर्षी पाचशे आणि Post – Doctoral Research साठी दरवर्षी दोनशे संशोधक विद्यार्थयाांना फेलोशिप देण्यात यावी, भारताबाहेर उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या किमान 50 गुणवंत विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी, राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात पाचशे मुला – मुलीं साठी शासकीय वसतिगृह बांधण्यात यावी, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी धिरज तेलंग राज्य प्रवक्ता, जिल्हा कोषाध्यक्ष तथा पुर्व विदर्भ मिडिया सेल प्रमुख प्रशिक खांडेकर, कार्यकर्ते नाजिम शेख, जिल्हा सदस्य क्षितीज इंगळे, क्षितिज ढोके आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.