ब्रम्हपुरी तालुक्यातील गायडोंगरी, माहेर व परसोडी (झिलबोडी) वासीयांच्या चेहऱ्यावर जलजीवन मिशन ने फुलविले हसु
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909
ब्रम्हपुरी :- केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडवण्याच्या अनुषंगाने जलजीवन मिशन अंतर्गत कालबद्ध कार्यक्रम आखुन अस्तित्वातील नळ योजनांचे पुनर्जीवन करणे व नवीन नळ योजनाचे कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असून सदर योजनाचा आराखडा तयार करतांना प्रती व्यक्ती ५५ लीटर प्रत्ती दिवस पाणी पुरुवण्याचे नियोजन ठेवून १४ योजनांचे आराखडे तयार करण्यात आले.
ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये एकुण १५-योजनांचा आराखडा तयार करुन गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरापर्यंत पाणी पोहोचण्याच्या अनुषंगाने नियोजन केले आहे. सद्यस्थितीत 59- योजनांची कामे भौतिकदृष्टया कामे पूर्ण करण्यात आली असून 44-योजनांची नळ जोडणीची कामे१००% पुर्ण करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे एकुण आराखड्पैकी २३- योजना सौर उर्जेवर आधारित तयार करण्यात आल्या असुन, विद्युत बिलाच्या तणावामधून ग्रामस्थांना कायम मुक्त करण्यात आले आहे.
१५-योजनांचा पाणी पुरवठा अविरत सुरु आहे. या यशस्वी योजनापैकी गायडोंगरी, परसोडी झिलबोडी व माहेर या तिन्ही योजनांचा पाणी पुरवठा सौर पंपाद्वारे होत असल्याने, ग्रामस्थांना पाणीपट्टीच्या करापासून कायम मुक्तता झाली .या तिन्ही योजनांद्वारे १००%. कुंटुबना आवश्यक व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत असुन शाळा, अंगणवाडी व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. योजनांच्या यशस्वी कार्यान्वयाबाबत सरपंच सचिव व ग्रामस्यांनी आभार व्यक्त करून समाधान व्यक्त केले आहे
या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिधिनी ग्रामीण पाणी पुरवठा शाखा अभियंता साहेबलाल मेश्राम
यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर योजनांचा आराखडा तयार करण्यापासून ते कार्यान्वित करण्यापर्यंत ची ईत्मंभु माहिती दिली.
सदर योजनांची कामे करताना येणाऱ्या प्रशासकीय तांत्रिक अडचणी तसेच
स्थानिक अडचणी आल्या , त्या मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शक सुचना तसेच कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे तसेच ओ. के. हेडाऊ साहेब यांच्य प्रमुख मार्गदर्शनात सोडवून यशस्वी करण्यात आली.
उर्वरित योजनांची कामे
प्रगतीपथावर असुन त्या सुद्धा लवकरच पूर्ण करण्याचा मानस शाखा अभियंता साहेबलाल मेश्राम यांनी व्यक्त केला आहे.
