पडोली मार्गावर ट्रक-बसचा भीषण अपघात

पडोली मार्गावर ट्रक-बसचा भीषण अपघात

१ ठार, १४ जखमी

साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197
घुग्घुस: येथून जवळच असलेल्या पडोली मार्गावर ट्रक-बसचा भीषण अपघात १४ मार्चला रात्री ११:३० ते १२:३० वाजताच्या सुमारास झाला.

बस क्रमांक एमएच १४ केए ८५८७ ही नागपूर हुन चंद्रपूरकडे येत असतांना पडोलीच्या कंडानगर चौकात रस्त्यावर उभ्या असलेल्या कोळश्याचा ट्रक क्रमांक एमएच ३१ सिक्यु ३११७ ला जोरदार मागून धडक दिली. अपघातात बसचा वाहक संदीप वनकर (रा. नगीनाबाग, चंद्रपूर) हा ठार झाला तर बसचा चालक दत्तात्रय इंगोले हा गंभीर जखमी असून १३ प्रवासी जखमी झाले.

चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीचा कोळश्याचा ट्रक हा रस्त्यावर उभा होता. नागपूर हुन चंद्रपूरकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या बसने ट्रकला धडक दिली.

ट्रक चालक राजन यादव याला पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. पुढील तपास पडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश हिवसे करीत आहे.