गडचिरोली येथील इंदिरानगर चौकाला शिवरायांचे नाव
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : आज समस्त हिंदु समाजाचे आराध्य दैवत हिंदु स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. मातृत्वाचा आदर, इतर धर्माचा सन्मान तसेच लहान थोर सर्वांचा सन्मान त्यांच्या कार्यातून केल्याने जीवाला जीव देणारे माणसं निर्माण झाली व यातून स्वराज्य निर्माण झाले. त्यामूळे सर्व समाजाला महाराजांचे स्मरण होत राहावे. या उद्देशाने गडचिरोली शहरातील इंदिरानगर वार्ड क्रं. 6 येथील तलाव रोड वरील चौकाला शिवराय असे नामकरण करण्यात आले. त्यावेळी गडचिरोली नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर यांचे हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी दिगंबर हाडगे, रोशन मुर्मुरवार, गिरीश पेंदोर, अरविंद चिचुलकर, आकाश सहारे, देशपांडे, संतोष मुर्मुरवार, दुमाने व इंदिरानगर येथील नागरिक उपस्थीत होते.
