सोशल मीडियावर डॉ.बाबासाहेबांची बदनामी करणाऱ्या तरुणावर वडनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
सोशल मीडियावर डॉ.बाबासाहेबांची बदनामी करणाऱ्या तरुणावर वडनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

सोशल मीडियावर डॉ.बाबासाहेबांची बदनामी करणाऱ्या तरुणावर वडनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

काचनगाव येथील समाज कंटकांचा प्रताप

सोशल मीडियावर डॉ.बाबासाहेबांची बदनामी करणाऱ्या तरुणावर वडनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
सोशल मीडियावर डॉ.बाबासाहेबांची बदनामी करणाऱ्या तरुणावर वडनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

✒आशीष अंबादे,प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.16 एप्रिल:-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी काचनगाव येथील सचिन उरकुडे नामक व्यक्तीने फेसबूक, व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून आरक्षण मुर्दाबाद व १४ एप्रिल काळा दिवस अशा आशयाचे मेसेज टाकून आंबेडकर चळवळीतील अनुयायांच्या भावना दुखावल्या, याबाबत वडनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, काचनगाव येथील सुनील दयाल ढोरे याला १४ एप्रिल रोजी सुरज ताकसांडे नामक मित्राचा दूरध्वनीवरून फोन आला. त्यावेळेस त्याने सचिन उरकुडेने फेसबुकवर आरक्षण मुर्दाबाद, १४ एप्रिल काळा दिवस, ५० लाख लाइक और शेयर चाहिये, ब्लॅक डे, आंबेडकर जयंती के विरोध में, आंबेडकर वाद मुर्दाबाद, एस सी, एस. टी. ऍक्ट मुर्दाबाद, जय परशुराम, जय सियाराम, जय मा दुर्गे, विषम विधानही, जय सनातन, कलंक दिवस १४ एप्रिल, जातिगत आरक्षण मुर्दाबाद, आंबेडकर कालिया की जयंती पर चप्पल की माला, काला रंग मुहपर लगाने के लिए आरक्षण मुर्दाबाद, अशा स्वरूपाच्या पोस्ट फेसबुक वर शेअर व लाईक करुन आंबेडकर चळवळीतील अनुयायांच्या भावना दुखावल्या. यावेळी येरणगाव, शिरजगाव, वडनेर, फुकटा येथील आंबेडकर चळवळीतील इतर संघटक कार्यकर्त्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी कदम, ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्याशी चर्चा करून सदर समाज कंटक सचिन उरकुडेवर वडनेर पोलिस ठाण्यात कलम १५३ अ. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. काचनगाव येथील बहुजन मुक्ती मोर्चाचे सुनील दयाल ढोरे व निखिल कांबळे यांनी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here