अत्यावश्यक कारण असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे: वर्धा जिल्हाधिकारी.

59

अत्यावश्यक कारण असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे: वर्धा जिल्हाधिकारी.
संचारबंदी नियमांचे पालन करा; स्वयंशिस्त पाळा
विनाकारण घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई

अत्यावश्यक कारण असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे: वर्धा जिल्हाधिकारी.
अत्यावश्यक कारण असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे: वर्धा जिल्हाधिकारी.

आशीष अंबादे,प्रतिनिधी✒
वर्धा,दि16 एप्रिल:- वर्धा जिल्हात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 1 मे रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील 15 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. या कालावधीत सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे. घरी राहून स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या प्रयत्नांना नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे हा सद्यस्थितीतील प्रभावी उपाय आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून या संसर्गापासून बचावासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.