आमदार रमेशआप्पा कराड यांचे हस्ते तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण.
आमदार रमेशआप्पा कराड यांचे हस्ते तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण.

आमदार रमेशआप्पा कराड यांचे हस्ते तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण.

आमदार रमेशआप्पा कराड यांचे हस्ते तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण.
आमदार रमेशआप्पा कराड यांचे हस्ते तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण.

राम भुतडा, लातुर जिल्हा प्रतिनिधी✒
लातूर:- भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य आमदार रमेशआप्पा कराड यांच्या स्थानिक विकास निधीतून नागरिकांच्या आरोग्याची प्राथमिकता लक्षात घेऊन तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना आवश्यक सेवा आणि तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी रुग्णवाहिका ही गरज लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषदेचे सदस्य आमदार रमेशआप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मुरुड येथील ग्रामीण रुग्णालय, पोहरेगाव आणि जवळा (बु) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी एक याप्रमाणे तीन सुसज्ज रुग्णवाहिका मंजूर केल्या. सदरील रुग्णवाहिकेचे शुक्रवारी आमदार रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी माजी खासदार सुनील गायकवाड, भाजपाचे ओबीसी सेलचे मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ.बाबासाहेब घुले, जिल्हा उपाध्यक्ष अनिल भिसे, सतीश आंबेकर, हनुमंतबापू नागटिळक, भागवत सोट, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, रेणापुर तालुका अध्यक्ष ॲड.दशरथ सरवदे, माजी सभापती अजित माने, सुरज शिंदे, श्यामसुंदर वाघमारे, सुधाकर गवळी, आनंत कणसे, वैभव सापसोड, रेणापुर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद दरेकर, श्रीकृष्ण पवार, शाहूराव हांडगे, अक्षय चेपट, अँड.धनराज शिंदे, लक्ष्मण खलंग्रे, प्रवीण शिंदे, गोपाळ पाटील, विलास सरवदे, विपुल चेपट यांच्यासह एमआयटी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठता डॉ.एन.पी.जमादार, उपअधिष्ठता नागोबा सर, प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे यांच्यासह अनेक जण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here