हिंगणघाट येथील डॉ. निर्मेश कोठारी वर झालेल्या भाड हल्ल्याचा विदर्भ विकास आघाडी तर्फे जाहिर निषेध.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.16 एप्रिल:- हिंगणघाट शरातील प्रसिद्ध डॉक्टर निर्मेश कोठारी यांना काही समाजकंटक लोकांकडुन दि.13 एप्रिल ला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा विदर्भ विकास आघाडीच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला आहे. डॉक्टरांची सुरक्षा जर आपण करू शकलो तरच शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राहील, त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी विदर्भ विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अनिल जवादे यांनी उपविभागीय अधिकारी दिनेश कदम यांना ई-मेल द्वारे केली आहे. ठाणेदार संपत चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून आरोपीवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे.

13 एप्रिल मंगलवारला रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एक रुग्ण डॉक्टरो कोठारी यांच्या रुग्णालयात आले असता त्यांच्या मुलाने डॉक्टर निर्मेश कोठारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्या मुलाचे वडील मरण पावले त्याचे दुःख त्याला झाले हे स्वाभाविकच आहे. परंतु त्याचा राग डॉक्टरवर काढून त्यांना मारहाण करणे हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा घटना जर शहरांमध्ये होत राहिल्या तर वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर संपावर जातील. आणी सर्व आरोग्य यंत्रणा आपली सेवा बंद करतील याचा सर्वात जास्त परिणाम सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर होईल. सध्याचा काळ हा कोरोना महामारीचा आहे. अशा नाजूक परिस्थितीमध्ये जर डॉक्टरांवर हल्ले होत गेले तर शहराची आरोग्य व्यवस्था कोलमडल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती फारच गंभीर आहे. म्हणून या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे परंतु सोबतच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा देणे हे सुद्धा गरजेचे आहे. यावेळी विदर्भ विकास आघाडीचे राजेश कुरेकार, महेश माकडे, दिनेश वाघ, जयंत धोटे, अजय मुळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here