भामरागड प्रकल्पातंर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामंकित निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता.
भामरागड प्रकल्पातंर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामंकित निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता.

भामरागड प्रकल्पातंर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामंकित निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता.

भामरागड प्रकल्पातंर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामंकित निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता.
भामरागड प्रकल्पातंर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामंकित निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 
गडचिरोली,(जिमाका)दि.16:- भामरागड प्रकल्पातंर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन 2021-22 या वर्षाकरीता फक्त इयत्ता 1 ली व 2 री करीता शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामंकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तेव्हा भामरागड व एटापल्ली तालुक्यातील इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश अर्जा सोबत पुढिल कागदपत्रे जोडून परीपूर्ण भरलेले प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड किंवा सुविधा केंद्र आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह एटापल्ली येथे जमा करावे.

अर्जासोबत जोडावे लागणारे कागदपत्रे: विद्यार्थ्यांचा नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र, पालकाचे जातीचे प्रमाणपत्र (असल्यास विद्यार्थ्यांचे), तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, अंगणवाडी दाखला (पहिल्या इयत्तेसाठी/ग्रामसेवकाचा दाखला), दारिद्रय रेषेखाली असल्यास त्या बाबतचा दाखला ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र / दाखला., महिला पालक विधवा/घटस्फोटित /निराधार/परितक्त्या असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा दाखला, आधारकार्ड झेराक्स प्रत अत्यंत आवश्यक (विद्यार्थी व पालक यांची). प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय. ए.आ.वि.प्र.भामरागड व सुविधा केंद्र आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह एटापल्ली येथे उपलब्ध आहेत.

अटी व शर्ती मध्ये प्रवेश घेण्यास इच्छूक विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, पालकांनी विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षाकिंत प्रत जोडण्यात यावी, विद्यार्थी हा दारिद्रय रेषेखालील असेल तर त्या संबंधीचा दाखला व ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु.1.00 लाखा पेक्षा कमी असावे, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याकरिता पालकांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो जोडण्यात यावे, जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र /जन्म दाखला ग्राहय धरण्यात येईल, अर्जासोबत विद्यार्थ्यांचे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे, विद्यार्थ्यांचे पालक हे शासकीय /निमशासकीय नोकरदार नसावेत, अर्जासोबत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड झेराक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. खोटी माहिती सादर केल्यास विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व पालकावर नियमानुसार न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल, प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 राहिल असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड जिल्हा गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here