चंद्रपूर जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश: पालकमंत्री विजय वडेट्टीवार

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजी करणारी असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता खबरदारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर उभारणीसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आज चंद्रपूर प्रशासनाला दिल्या आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर, जिल्ह्यातील तपासणी मोहिम, आरोग्यविषयक अत्त्यावश्यक असणाऱ्या सेवा सुविधा याचा आढावा घेऊन शासनस्तरावर लागणारी मदत तत्काळ उपलब्ध करुन देता यावी यासाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते,आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.