जय शिवराय…. जय भिमराय…..
कवि पोलीस नाईक विनोद अहिरे
बाबा तुम्ही माझ्या हातात लेखणी देऊन,
माझ्या अंतरंगातील निद्रिस्त ज्वालामुखीला जागृत केलंय.
तो शब्द रूपाने ऊसंड्या घेऊन आता बाहेर येत आहे.
ही शब्दांची गर्दी, ही अंगावरची वर्दी,
सारकाही तुमचंच आहे.
ही लेखणी,
कधी महाराजांची तलवार होते.
कधी विद्रोहाची मशाल होते.
कधी संविधानातून शब्द घेते.
कधी देशद्रोह्यांचे कंठ फोडते.
कधी समाजकंटकांच्या पोटात खचकन घुसते.
तर……
कधी बुद्धांची अहिंसा होते.
या तुमच्या लेखणीतील शाहीचा टिळा मस्तकी लावून,
या प्रतिकूल परिस्थितीतही यशस्वी मार्गक्रमण करीत आहे बाबा….