जळगाव कडकडीत बंदचा दुसरा दिवस, ठीक ठिकाणी पोलीस तैनात.
✒विशाल सुरवाडे, जळगाव जिल्हा प्रतिनिधी✒
जळगाव,दि.16 एप्रिल:- जळगाव जिल्हात कोरोना वायरस विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असुन, वाढत असलेल्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जळगाव जिल्हात 14 एप्रिल पासुन 1 मे पर्यंत कडकडीत संचारबंदी जाहिर करण्यात आली आहे.
कोरोनाच्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्रेक दिसून येत आहे पार्श्वभूमीवर 14 एप्रिल रात्री 8 वाजता पासून 15 दिवस कडकडीत बंद चा आदेश दिला गेला आहे. त्यात आजचा दुसरा दिवस. ठिकाणी पोलीस तैनात असून आकाशवाणी चौकात वाहनधारकांची कडक तपासणी केली जात आहे. तर काही ठिकाणी नियमांचे पालन न करता नागरिक बिनधास्त फिरतांना दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या प्रयत्नांना नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जारी करण्यात आलेल्या नियमावलीचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे हा सद्यस्थितीतील प्रभावी उपाय आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून या संसर्गापासून बचावासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.