नागपुर कोरोना बांधीत रूग्णाची स्थिती गंभीर, व्हेंटिलेटर्स बेड संपले, एका बेडवर दोन रुग्ण, जमिनीवर झोपवून ऑक्सिजन.
✒मुकेश चौधरी विदर्भ ब्युरो चीप✒
नागपूर,दि.16 एप्रिल:- महाराष्ट्र कोरोना वायरसचा विस्फ़ोट सुरु असुन हररोज हजारो कोरोना वायरस बांधीत रुग्ण समोर येत आहे. तर दुसरी कडे शेकडो रुग्ण रोज मयत होत असल्याचे आकडा वरुन समोर येत आहे. त्यामुळे संपुर्ण आरोग्य विभाग हतबल झाला आहे. अशीच स्थिती राहिल तर, महाराष्ट्रात कोरोना वायरस हाहाकार माजवील्या वीना रहणार नाही.
उपराजधानी नागपूरात आरोग्य यंत्रणा पार कोलाडुन गेल्याच विदारक सत्य बाहेर आल आहे. नागपूरातील सर्वात मोठे असलेले रूग्णालय मेडिकल रुग्णालयातील स्थिती खुपच गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातील सर्वात मोठ्या रुग्णालयात रुग्णांना बेड नसल्याने मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जमिनीवर झोपवून ऑक्सिजन दिले जात आहे. एका बेडवर कोरोनाच्या दोन रुग्णांवर सुरु उपचार आहे. गेल्या 10 दिवसांपासून मेडिकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मेडिकलच्या बाहेरही फुटपाथवर रुग्ण झोपले असल्याची धक्कादायक माहिती येत आहे.
माघिल काही दिवसा पासून नागपुर मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस बांधीत रुग्ण मिळुन येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागपुरातील जिल्ह्यातील रुग्णालयातील व्हेंटीलेटर्स बेड संपले आहेत. म्हणून कोरोना वायरस बांधीत रुग्णांला जमिनीवर झोपवून उपचार केला जात आहे.
देशातील नागपूर हे कोरोना वायरस हार्टस्फोर्ट बनल आहे. देशातील सर्वात जास्त कोरोना वायरस बांधीत असल्याल्या रुग्णाचा यादीत नागपुर वरचा स्थानावर असल्याचे दिसून येत आहे. नागपुरात कोरोना बाधितांची संख्या तीन लाखांच्या जवल पोहोचली आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 2 लाख 84 हजार 258 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 लाख 21 हजार 387 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 58 हजार 507 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 4 हजार 318 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.