कोटगांव येथे डाॅ, बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटात साजरी

कोटगांव येथे डाॅ, बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटात साजरी

कोटगांव येथे डाॅ, बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटात साजरी

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभीड –तालुक्यातील कोटगांव येथे तक्षशिला बुद्ध विहार समीतीच्या वतीने डाँ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वि जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. यावेळी अरविंद सांदेकर पुर्व विदर्भ समन्वयक ,वंचित बहुजन आघाडी , धर्मविर गराडकर हे उपस्थीत होते. धम्म रँली उद्घाटण अरविंद सांदेकर यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी रँलीला संबोधीत करतांना अरविंद सांदेकर म्हणाले की संविधानामुळे आज आम्ही एकञ आलो आहोत.बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आज ताठ मानेने जगत आहोत. संविधानामुळेच आज आम्ही सुटाबुटात आहोत. नाहीतर आम्ही जंगलात शिकार करत असतो. आज या देशात संविधान व आरक्षणा बाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत.संविधानामुळेच आम्हाला आरक्षण मीळाले आहे. चाय विकणारा माणुसही या देशाचा प्रधानमंञी बनु शकतो एवढी ताकत या संविधानात आहे. यांतर राँली गावातील मुख्य मार्गाने काढन्यात आली. या रँलीत आदीम माना जमात संघटनेने भाग घेतला तसेच गावातील विविध नागरीक या रँलीत सहभागी झाले होते. जवळ जवळ चार तास रँली गावभर फिरुन तक्षशिला बुद्धविहार कोटगांव येथे समापन झाली. त्यानंतर ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच सुनील वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी बाबासाहेब आंबेडकर ,म.फुले,सम्राट अशोक यांच्या प्रतिमांना विधिवत पुजा करुन पुष्पहार टाकन्यात आले. यावेळी आत्माराम श्रीरामे, रामचद्रं रंधये, रामदास रंधये आणी बहुसंख्य आदीवासी समाज उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय बांबोळे, अशोक मेश्राम , प्रदिप बांबोळे, नदांकर मेश्राम , संभा निमगडे,आनंद जांभुळे, शैलेश बांबोळे, अमीत मेश्राम , मयुर जांभुळे यांनी मेहनत घेतली. तर उपस्थितांचे आभार आनंद मेश्राम यांनी मानले.