एन.जे.पटेल महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
मोहाडी :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील स्थानिक एन.जे.पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतीक विभागा द्वारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वभूषण, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी भीम गीतांचा कार्यक्रम व बाबासाहेबांच्या कार्यावर विचारमंथन आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एस.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. बी. भैसारे यांनी प्रास्ताविकपर भाषणातून बाबासाहेबांचे भारत देशावरचे प्रेम, त्यांची दूरदृष्टी, त्यांच्या स्वप्नातला आदर्श भारत, आजचे राजकारण, राज्यकर्त्यांची व नागरिकांची जबाबदारी यावर प्रकाश टाकला. ग्रंथपाल डॉ. वरकडे यांनी शिक्षणाचे व वाचनाचे महत्व यावर भाष्य केले. डॉ. राऊत मॅडम यांनी बाबासाहेबांची राजकीय भूमिका व संविधांनावर आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. पवार सर यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक विचारावर प्रकाश टाकला. प्रा. जाधव सर यांनी आपली जबाबदारी व बाबासाहेबांच्या अध्यक्षीय स्थानावरून डॉ. पांडे मॅडम यांनी बाबासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता विशद केली॰ अशा रीतीने बाबासाहेबांच्या विविध विचारावार विचारमंथन करून भीम गीतांची पर्वणी सादर करण्यात आली. दामिनी राखडे मधुरा लांजेवार, गौरी ठाकरे, रोशन शिंगडे, मोहन नंदनवर, नेहा मते, वैभव हारगुडे, पायल झेलकर, स्नेहल कुलरकर, मयूरी बावणे, दिव्या राखडे, मुक्ता भाजीपाले या विद्यार्थ्यानी क्रांतिकारी भीम गीते सादर केलीत. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वानखेडे सर तर आभार प्रदर्शन दीक्षा हेडाऊ ने केले.