महाड तालुक्यातील पिंपळदरी येथे मरीआई व ज्योतीबा महाराज यांचा संयुक्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न

महाड तालुक्यातील पिंपळदरी येथे मरीआई व ज्योतीबा महाराज यांचा संयुक्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न

महाड तालुक्यातील पिंपळदरी येथे मरीआई व ज्योतीबा महाराज यांचा संयुक्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):-महाड तालुक्यातील पिंपळदरी गावातील शेटे भावकीची कुलस्वामिनी श्री मरीआई व ज्योतीबा महाराज यांचा संयुक्त शतकोत्तर रौप्य महोत्सव पालखी सोहळा वर्षे १२५ वे आणि कुलस्वामिनी मंदिर जिर्णोध्दार दि.१४ एप्रिल ते १६ एप्रिल २०२२ पर्यंत मौजे पिंपळदरी येथील शेटे भावकी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मुख्य मंदिर, मंदिर गाभारा, सभामंडप उद्घाटन, उदकशांती पुजा, पंचायतन प्रतिष्ठा, गणेश पुजन, महाप्रसाद, सुस्वरभजन हरिजागर, होमहवन, सत्यनारायण महापूजा, ध्वजपुजा, माहेरवाशिणी व मान्यवरांचा सत्कार समारंभ, किर्तन, मृदंगचार्य, गायनाचार्य, हरिपाठ, भोजन व्यवस्था, श्री मरीआई व ज्योतीबा यांच्या काठीची व पालखीची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली अशा प्रकारचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यासाठी शेटे भावकी, पिंपळदरी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, नवतरुण मित्र मंडळ, मुंबई-पुणे मंडळ पिंपळदरी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.