अधिकारी सुस्त,रेती तस्कर मस्त
✒सागर अलोने✒
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
96375 65247
तळोधी बांः अप्पर तळोधी बा.तालुक्यात व आजूबाजूच्या परिसरात कुठल्याही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना रात्रभर रेतीची अवैध तस्करी होत असताना मात्र अधिकारी वर्ग सुस्त पणे झोपी जाऊन रेती तस्करांना रान मोकळे केल्याने शासनाला करोडो रुपयाचा फटका बसला जात आहे .
महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ज्या क्षेत्रांत रेती घाटाचा लिलाव झालेला नाही .त्या क्षेत्रातील रेती तस्करी धारकावर अकुंश ठेवण्यासाठी तालुका स्तरावर टिम तयार केलेली असताना मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई न करता रात्रभर अधिकारी वर्ग सुस्त अवस्थेत झोप घ्यायचे आणि त्याच्या फायदा तस्करी धारकाकडून घेतला जात आहे .तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात नाल्यालगत मोठे मोठे खड्डे पाडून मुरुम,रेती या अवैध गौण खणीजाची तस्करी होत असताना त्या विभागाकडून सुध्दा कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रेती तस्कर सैराट झालेले आहेत .तसेच या भागात विना परवाना राँयल्टी ने टिप्पर व ट्रँक्टरने रात्रीच्या वेळेस पोलिस स्टेशन समोरून वाहतूक होत असताना सुध्दा रात्रीचे गस्त धारक पोलिस रेती तस्कर धारकासबोत अर्थपुर्ण संबंध असल्याने कारवाई करीत नसल्याने शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडाला जात आहे .तसेच रात्रीचे वेळेस रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रंँक्टर व ट्राँलीवर वाहन नंबर प्लेट नसलेल्या वाहणाला थांबून चौकशी केली जात नसल्यामुळे कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होत आहे .त्या मुळे या परिसरात होत असलेल्या अवैध गौण खनिज धारकावर कारवाई करुन गौण खनिज विभाग ,महसुल विभाग ,व पोलिस विभागानी लक्ष देऊन महसूल बुडणारा रेती तस्कर धारकावर कारवाई करण्याची मागणी जनतेच्या वतीने करण्यात आली आहे .