गावाच्या विकासाकरीता वन व्यवस्थापन समितीतील निधी खर्च व्हावा-अनिल डोंगरे

गावाच्या विकासाकरीता वन व्यवस्थापन समितीतील निधी खर्च व्हावा-अनिल डोंगरे

गावाच्या विकासाकरीता वन व्यवस्थापन समितीतील निधी खर्च व्हावा-अनिल डोंगरे

हस्तक वाळके
मुल तालुका प्रतिनिधि
9503528789

चंद्रपुर – वन व्यवस्थापन समिती जुनी पडली च्या माध्यमातून गॅस कनेक्शन वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल डोंगरे राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार महाराष्ट्र शासन नामदेव डाहुले, बंडुजी धोत्रे अध्यक्ष इको प्रो भारत बल्कि सरपंच पडोली, अनिताताई नागरकर उपसरपंच वंदना आवळे,भूषण गोधने, सुभाष आवळे हे होते या कार्यक्रमात जुनी पडली येतील वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून चाळीस लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले.आपले मार्गदर्शनात अनिल डोंगरे यांनी माननीय आमदार सुधीर मुनगंटीवार माजी अर्थमंत्री तथा वनमंत्री यांच्या कार्यकाळात विचोडा (बू),छोटानागपूर ,आंबोरा,जुनी पडोली ,मोरवा,चारगाव,ताडाळी या सात गावाचा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेत समावेश करून त्या प्रत्येक गावाच्‍या वन व्यवस्थापन समितीत 25 लाख रुपये निधी गावाच्या विकासाकरिता देण्यात आला परंतु आजही तो निधी काही गावांमधील शिल्लक असून व शासनाने नव्याने निधी व्यवस्थापन समिती मध्ये देण्यात आला असून हा एकूण निधी गावाच्या विकासाकरिता खर्च व्हावा याकरिता या गावाच्या व्यवस्थापन समिती ने प्रयत्न करावे. अशे ते यावेळी बोलले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशाल वाढई व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय माशिरकर व समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.