सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड येथे वर्ग सातवा ला निरोप,

सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड येथे वर्ग सातवा ला निरोप

सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड येथे वर्ग सातवा ला निरोप,

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड–सरस्वती ज्ञान मंदिर नागभीड येथील 7 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाला स्वराज्य बहु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गजपुरे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक सतीश गजपुरे,शाळेचे मुख्याध्यापक गोकुल पानसे, सहा.शिक्षक आशिष गोंडाने,पराग भानारकर, सतीश जीवतोडे,सहायक शिक्षिका आशा राजूरकर मॅडम,किरण वाडीकर मॅडम,भावना राऊत मॅडम यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी प्रस्ताविकातून किरण वाडीकर मॅडम यांनी वर्ग 7 वि च्या शाळेतील 7 वर्षाच्या वाटचालीबद्दल माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी गजपुरे यांनी मार्गदर्शन करताना आपण प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शाळेचे व शाळेतील शिक्षकांचे पुढे भविष्यातही आपल्या कर्तुत्वाने उज्वल करावे तसेच शाळेतून मिळालेले संस्कार,शिस्त कायम स्वरूपी आपल्या जीवनात उतरवावे असे मार्गदर्शन केले. वर्ग 7 वीचे वर्गशिक्षक पराग भानारकर यांनी पुढील जग हे स्पर्धेचे असून कोणतेही मोठे संकट आले तरी त्याला घाबरून न जाता जिद्दीने त्यातून मार्ग काढून पुढे जावे असे प्रतिपादन केले. यावेळी जीवतोडे सर,गोंडाने सर,राजूरकर मॅडम यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.. तसेच वर्ग सातवी च्या विद्यार्थ्यांनी आपले शाळेविषयी व शिक्षकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी उत्कृष्ट जि.प. सदस्य हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय गजपुरे यांचा शाल व श्रीफळ देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी वर्ग सहावी व पाचवी च्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले तर वर्ग सातवीने फॅशन शो सादर केले तसेच ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील पात्राची ओळख करून दिली.
सरतेशेवटी “वी शाँल ओव्हरकम” या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर गोड जेवणाने निरोप समारंभाचा शेवट झाला.
या निरोप समारंभाचे सूत्रसंचालन वर्ग सहावी ची विद्यार्थिनी सलोनी नामदेव सहारे व ओम राऊत या विद्यार्थ्यानी केले.