मानसी विनोद वरखडे हिची वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता निवड.
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभीड– येथील विनोद वरखडे यांची कन्या मानसी विनोद वरखडे हिची एम.बी.बी.एस. करिता निवड झालेली असून तिला मुंबई येथील टोपीवाला नँशनल मेडिकल कॉलेज (नायर मेडिकल कॉलेज) मिळाला आहे.. मानसीने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण विद्यानिकेतन कॉन्व्हेंट ब्रम्हपुरी इथून पूर्ण केले असून अकरावी बारावी सेंट पाँल कॉलेज नागपूर इथून पूर्ण केले आहे..सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आता डॉक्टर होत असल्याने सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे..
मानसीने आपल्या यशाचे श्रेय आपले गुरुजन व आई- वडील यांना दिले आहे.