“वारसा जतन विचारांचा,जल्लोष महामानवांच्या जयंतीचा, सन्मान निस्वार्थी समाजकार्याचा”

54

“वारसा जतन विचारांचा,जल्लोष महामानवांच्या जयंतीचा, सन्मान निस्वार्थी समाजकार्याचा”

गुणवंत कांबळे

मुंबई प्रतिनिधी

मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई. सायन कोळीवाडामध्ये १२ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान तीन दिवसीय भीमजयंती महोत्सव” बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र ५२२ संलग्न माता रमाई महिला मंडळआणि श्रावस्ती बौध्दजन सेवा संघ (रजि.)ह्या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ११ एप्रिलक्रांतिज्योती ज्योतिबा फुले यांच्या जयंती चे औचित्य साधून

१२ एप्रिल २०२३ रोजीघरोघरी रांगोळी स्पर्धा,

१३ एप्रिल २०२३ रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

१४ एप्रिल २०२३ रोजी सर्व नागरिकांसाठी घर सजावट स्पर्धा

अशा विविध स्पर्धा आखून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून 

दि. १४ एप्रिल २०२३ रोजी आयोजित केलेल्या महिला मेळावा दरम्यान कोणतीही पदाची अपेक्षा न राखता श्रावस्ती बुध्द विहार मध्ये योगदान देणाऱ्या प्रामाणिक, निस्वार्थ भाव राखणारे आयु. शरद सखाराम हातखंबकर यांना आणि धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी निम्म आयुष्य पुर्ण वेळ धम्मकार्यासाठी स्वतः ला वाहून घेतलेले, महिलांना सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी मार्गदर्शन करणारे, लहानांपासून जेष्ठांच्या मनात आदराचे स्थान मिळविणारे आदरणीय बौध्दाचार्य आयु. जितेंद्र सखाराम कांबळे गुरूजी यांना “समाज रत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

महामानवांच्या जयंती निमित्त हा केलेला गौरव विशेष उल्लेखनीय होता. समाजासाठी धकाधकीच्या जीवनात योगदान देणे अशक्य असतानाही आपला बहुमुल्य वेळ समाजाला देणे आणि समाजाला योग्य दिशा देणे हे आधुनिक काळातील अशक्य कार्य करणा-यांचा सन्मान होणे, हि समाजासाठीही गौरव ठरते. 

यासाठी सन्मानासाठी प्रामुख्याने बौध्दजन पंचायत समिती, शाखा क्र. ५२२ चे विद्यमान अध्यक्ष प्रदिप हर्चिरकर, उपाध्यक्ष दिनेश ईस्वलकर, सचिव निलेश ईस्वलकर, संदेशवाहक संतोष सकपाळ, प्रशांत ऐणारकर, श्रावस्ती बौध्दजन सेवा संघ (रजि.) चे खजिनदार अमोल कदम, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती ईस्वलकर, सचिव जान्हवी माजलकर, उपसचिव स्वप्नाली सकपाळ खजिनदार प्रणाली खानविलकर, शमिका कांबळे यांच्या निवड समिती मार्फत करण्यात आलेल्या शिफारशीनुसार गौरविण्यात आले.

तसेच, घराघरात महामानवांचे विचार पोहचावे, यासाठी घराघरात जातीची बंधन धुडकावून सर्व नागरिकांसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घर सजावट स्पर्धा मधील विजेत्या स्पर्धकांना गौरव पत्र आणि आकर्षक बक्षिसे वाटप करून सहभागी स्पर्धकांना गौरव पत्र देऊन सन्मानित केले गेले. 

महिला मेळावा समापण करत असताना महिलांसाठी शालू भेट म्हणून देण्यात आल्या. कोणत्याही प्रकारचे देणगी न घेता, कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींचे हुजरे न बनतआ स्वकर्तृत्वाने महिलांनी आपल्या वार्षिक बचतीतून शालू विकत घेऊन वाटप केले, हे अधिक विशेष.अशा सोहळ्यातूनच ख-या अर्थाने नव्या पिढीला दिशा मिळते. शेवटी सर्वांचे जाहिर आभार मानून सामुदायिक सरणंत्तंय् गाथेने समारोप करण्यात आला.