भीम जयंती निमित्त वृद्धाश्रमास खिचडी वाटप, अशोक अग्रवाल व ऍड विजयकुमार कस्तुरे यांचा स्तुत्य उपक्रम
मनोज एल खोब्रागडे
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मो: 9860020016
चिखली :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती चे औचित्य साधून शहरातील प्रतिष्ठित व दानशूर व्यापारी उद्योजक अशोक अग्रवाल यांच्या वतीने ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे खिचडी वाटप करण्यात येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष भोकर चे सरपंच गजानन फोलाने उदघाटक अग्रसेन रिसॉर्ट चे संचालक अशोक अग्रवाल प्रमुख मार्गदर्शक डॉ.विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, प्रमुख उपस्थितीत उपसरपंच भोकर, अनंता डोंगरदिवे, कवी साहित्यिक शाहीर मनोहर पवार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जाधव, होमगार्ड राजू अनपट, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती कऱ्हाडे हे होते.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव प. पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहचले पाहिजेत तेव्हाच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल असे मत अशोक अग्रवाल यांनी मांडले. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजा साठी केलेला संघर्ष विषद करताना डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी सांगितले कि त्यांचे विचार समाजाच्या तळागाळा पर्यंत पोहचले पाहिजेत परंतु त्यासाठी आपण सर्वांनी सर्व महापुरूषांची चरीत्रे व त्यांच्या कार्याची माहिती आपण जाणून घेतली पाहिजे.मात्र त्यासाठी त्यांच्या पुस्तके व ग्रंथांचे वाचन सुध्दा आपणास करणे आवश्यक आहे.
तसेच सामाजिक कार्यकर्ते माळी मामा सुधाकर जाधव म्हणाले एक विधायक कार्यक्रम म्हणून तुकाराम आश्रय वृद्धाश्रम या माध्यमातून गोर गरीब निराधार वृद्धाना आश्रय देऊन त्याचे संगोपन करीत असल्याचे सांगून प्रशांत डोंगरदिवे व रुपाली डोंगरदिवे या दाम्पत्त्याचे त्यांनी भरभरून कोतुक केले. शाहीर मनोहर पवार तथा उपसरपंच यांनीही जनसामान्य नागरिकांनी या वृद्धाश्रमाला सहकार्य करावे असे मत व्यक्त केले. तसेच गावपातळीवर वृद्धाश्रमास लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन गजानन फोलाने यांनी केले.
यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धासह प्रकाश डोंगरदिवे, रजनीकांत डोंगरदिवे उत्तम महाराज डोंगरदिवे, विनोद डोंगरदिवे, निंबाजी वानखेडे, केशव डोंगरदिवे, नामदेव डोंगरदिवे, राहुल घेवंदे, भास्कर डोंगरदिवे, सचिन डोंगरदिवे, संतोष डोंगरदिवे, मुकुंदा डोंगरदिवे, अजय डोंगरदिवे, रवींद्र घेवंदे, जगदेव डोंगरदिवे, अमोल वाकोडे, आशा डोंगरदिवे, स्वाती डोंगरदिवे, कौसा डोंगरदिवे, कांता डोंगरदिवे, द्वारका घेवंदे, भागुबाई वानखेडे, अर्चना डोंगरदिवे, कावेरी डोंगरदिवे, वदंना डोंगरदिवे, कुसम डोंगरदिवे, सविता डोंगरदिवे, संगीता डोंगरदिवे, यांच्या सह गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे तर आभार प्रदर्शन रुपाली डोंगरदिवे यांनी केले.