बहुजन हितकारिणी सभा माणगांव कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी

51

बहुजन हितकारिणी सभा माणगांव कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी

✍️मंगेश मेस्त्री✍️

माणगांव. तालुका. प्रतिनिधी

📞9923844308📞

माणगांव -आपल्या हक्काचे व्यासपीठ, हाक तुमची साथ आमची,सदैव तत्पर जनसेवेसाठी!! बहुजन हितकारिणी सभा माणगांव,महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने महामानव, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची माणगांव येथील कार्यालयात १३२ वी जयंती मोठ्या प्रमाणात संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष मा. श्री. रविंद्र दाजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली,यावेळी मा.अध्यक्ष यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. तसेच महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार माणगांव तालुका अध्यक्ष-श्री. मंगेश मेस्त्री यांनी केले तसेच माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मोर्बा. विभागीय अध्यक्ष- श्री. प्रदीप जाधव व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन निजामपूर विभागीय अध्यक्ष -श्री. जनार्दन सावंत, दिप प्रज्वलन मा. श्री. युवराज कदम, धूप पूजा विधी श्री. भीमराज मोरे सर व संस्कार विधी माजी तालुका अध्यक्ष श्री. बाजीराव गायकवाड या सर्वांच्या उपस्थितीत बौद्ध वंदना व अभिवादन करून पूजन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी व संघटनेतील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका”, “संघटित व्हा” आणि “संघर्ष करा” हा मुलमंत्र देत बहुजनांना उन्नती आणि समाजोद्धाराचा मार्ग दाखवला. सामाजिक न्याय व समतेचा पुरस्कार करत समाजातील उपेक्षितांसाठी संघर्ष केला.त्यांचे विचार केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी व दिशादर्शक आहेत.असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीतील काही अनमोल उदाहरणे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रविंद्र दाजी मोरे यांनी दिली.तसेच प्रत्येक दर्गा, देऊळ व बुद्ध विहारांची साफसफाई करणे, पुढील कार्यक्रमाचे नियोजनबाबत चर्चा व तालुक्यातील बहुजन समाज बांधवांसाठी जेवढी सेवा करता येईल,तेवढी सेवा मी करीन व ही सेवा सर्वांनी मिळून करू असेही त्यांनी सांगितले. संघटनेचे महासचिव श्री. भीमराज मोरे सर यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही शैक्षणिक व सामाजिक बाबीतील महत्त्वाचे मुद्दे मांडले. माजी. तालुका अध्यक्ष -श्री. बाजीराव गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी संघटनेचे मोर्बा. विभागीय अध्यक्ष श्री. प्रमोद जाधव यांनी संघटनेतील उपस्थित कार्यकर्त्यांना अल्पोपहार देऊन सर्वांचे तोंड गोड केले.

अशाप्रकारे बहुजन हितकारिणी सभा, माणगांव कार्यालयात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली.