जगातील पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरणार

57

जगातील पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरणार

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

हा लेख लिहिण्या आधी समाजाच्या विकासासाठी ,जगाच्या कल्याणासाठी व भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले घरदार सोडून, अख्यं तरूणपण वाहिले व आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावून जगले आणि जगात अजरामर होऊन गेले त्या सर्व महा विभूतींना मी कोटी, कोटी विनम्र अभिवादन करते व त्यांच्या महान कार्या पुढे मी नतमस्तक होते.

आपल्या भारत देशभर तसेच विदेशात आणि अनेक राज्यात व महाराष्ट्र राज्यात सुद्धा आज पर्यंत अनेक साहित्य संमेलन झालेले आहेत, होत आहेत, आणि समोरही होत राहतील.. या विषयी आपण चांगल्याप्रकारे जाणूनच आहात व अशा अनेक साहित्य संमेलनात आपण सहभागी सुद्धा झाले असणार.. यात काही शंका नाही. पण, आज पर्यंत जगातील पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन होतांना कधी बघितले आहात का. .? किंवा कुठे ऐकले आहात का. ..? कदाचित कुठे वाचले नसणार व ऐकले सुद्धा नसणार कारण आजपर्यंत पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन कुठेच झाले नाही आणि कधी भविष्यात होईल की नाही याची गॅरंटी नाही म्हणूनच भव्य अशा जगातील पहिलेच आदिवासी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन १५ व १६ एप्रिल ला महाराष्ट्र राज्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याच प्रमाणे आदिवासी जिल्ह्या म्हणून प्रख्यात असणाऱ्या गडचिरोली येथे दोन दिवसाचे पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन धानोरा मार्गावरील महाराजा लान येथे करण्यात आले आहे.

होणाऱ्या साहित्य संमेलनाची भारत देशातच नाही तर विदेशात सुद्धा जोरात चर्चा चालू आहे मग आपणच विचार करा होणारे हे पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलन किती महत्वाचे असेल…? व महिलांच्या हितासाठी, तसेच विकासासाठी असेल.. या संमेलनाचे आयोजन सुप्रसिद्ध साहित्यक तसेच सातासमुद्रापार ओळख असणाऱ्या विचारवंत, अभ्यासक कुसुम ताई अलाम यांनी केले आहेत त्याबरोबरच अनेक महोदयांनी त्यांना प्रोत्साहन, साथ दिली आहे सर्व प्रथम कुसुम ताईच्या या महान कार्याला अनेक शुभेच्छा देते व त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. खरं जर…बघितले तर आदिवासी महिला साहित्य संमेलन होणे अत्यंत आवश्यक होते पण,उशीरा का होईना या थोड्या दिवसात गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आदिवासी महिला साहित्य संमेलन होत आहे हि गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

      या आदिवासी महिला साहित्य संमेलनात भारत देशातील बरेच राज्यातील नावाजलेले व्यक्तीमत्व उपस्थित राहणार आहेत जसे, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, महाराष्ट्र येतील मान्यवर व बहुसंख्य आदिवासी बंधू, भगिनीं उपस्थित राहणार आहेत. या भव्य अशा आदिवासी महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मेघालय येतील साहित्य एकादमी पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ.प्रा.स्टीमलेट डखार असणार आहेत उद्घाटक म्हणून नजुबाई गावित ,संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार हिरामण वरखडे असणार आहेत तसेच विशेष अतिथी म्हणून फुरमन चौधरी, डॉ.अभय बंग, डॉ.हिना गावित,रुपाली गावित, राहणार आहेत, निमंत्रित मान्यवर म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ,माजी मंत्री मधुकरराव पिचड तसेच इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. या भव्य अशा आदिवासी महिला साहित्य संमेलनात ‌व समाजाच्या चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्वाचे सत्कार सुध्दा होणार आहेत सोबतच पहिल्या सत्रात कथाकथन व दोन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे बरेच काही आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की,होणारा हा आदिवासी महिला साहित्य संमेलन कसा असणार. .त्या साठी आदिवासी समाजातील बंधू ,भगिणींनी जास्तीत, जास्त उपस्थिती दर्शवावी खास करून भगिणींनी मग ती कोणत्याही समाजातील का असेना पण,या संमेलनासाठी वेळात, वेळ काढून यायला पाहिजेत. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की, हा फक्त आदिवासी महिला साहित्य संमेलन आहे फक्त तिथे महिलाच पाहिजे असं अजिबात नाही या संमेलनातून सर्वाना खूप काही शिकायला मिळणार आहे.

       सोबत आदिवासी संस्कृती व अनेक विषयावर चर्चा होणार आहेत काही मान्यवर वक्ते यात मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत नुसता साहित्य संमेलन नसुन येणाऱ्या भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, प्रोत्साहन देणारा आहे सोबतच यातून आदिवासींचे जीवन त्यांचे चालू असलेले संघर्ष व त्यांनी कशाप्रकारे जगले पाहिजे, कशाप्रकारचे अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे, त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान, पर्यावरण व इतर महत्वाच्या विषयावर सुध्दा वक्त्यांच्या भाषणातून शिकायला मिळणार आहे. खरंच अतिशय आनंदाचा क्षण व दोन दिवसाचे साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरणार आहे यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहून आदिवासी महिला साहित्य संमेलनासाठी उपस्थित रहावे व कधी न होणाऱ्या या साहित्य संमेलनाला सहकार्य करावे एवढेच नाही तर..इथून काहीतरी शिकून घेण्यासाठी यावे व इतरांना सुद्धा सोबत घेऊन यावे व महती सांगावी कारण होणारा पहिला आदिवासी महिला साहित्य संमेलन हा ऐतिहासिक ठरणार आहे तो,आजपर्यंत कधीही झाला नाही म्हणून बघण्यासाठी अवश्य यावे, खरंच एवढ्या भव्य पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन केलेल्या महान नारीशक्ती कुसुम ताई अलाम यांचे विशेष धन्यवाद असेच त्यांच्या संपूर्ण टिमचे अभिनंदन सोबतच पुढच्या वाटचालीस त्यांना भरभरून शुभेच्छा.