शेतकरी बांधवांनो ! सध्याच्या एप्रिलपेक्षा मे महिन्यात पडणार मुसळधार पाऊस ; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केला अंदाज व्यक्त

58

शेतकरी बांधवांनो ! सध्याच्या एप्रिलपेक्षा मे महिन्यात पडणार मुसळधार पाऊस ; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केला अंदाज व्यक्त*

जितेंद्र कोळी

पारोळा प्रतिनिधी

मो:- 9284342632

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा चिंतेची बातमी समोर येत आहे. खरं पाहता सध्या राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे आणि 19 ते 20 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. सोबतच डखं यांनी पुढल्या महिन्यातदेखील अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 18, 19, 20 एप्रिल दरम्यान पुन्हा अवकाळी पाऊस पडेल. वास्तविक हवामान विभागाने 17 एप्रिल नंतर राज्यात पावसाची उघडीप राहील, असं सांगितले आहे. पण डख यांनी 20 एप्रिलपर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. यामुळे डख यांचा हा अंदाज जर खरा ठरला तर निश्चितच शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

मे महिन्यातदेखील एप्रिल प्रमाणेच पाऊस कोसळणार असल्याचे चित्र आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे मे महिन्यात पहिल्या आठवड्याच्या शेवटी मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच 15 मे नंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

हा पाऊस कुठे आणि कोणत्या जिल्ह्यात पडेल याबाबत अद्याप पंजाबरावांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. परंतू येत्या काही दिवसात लवकरच याबाबत पंजाबराव माहिती देणार असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत पुढल्या महिन्यातही पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब असून शेतकऱ्यांना निश्चितच या गोष्टीची काळजी घेऊन आपल्या शेती पिकांचे संरक्षण या ठिकाणी करावे लागणार आहे.