लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

अमान क़ुरैशी
सिंदेवाही प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही :- लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही शहर व नवरगावातील मुख्य मार्गाने पोलीसांनी रूट मार्च काढला .विशेष म्हणजे यात तामिळनाडू राज्याच्या पोलीसांच्या विशेष पथकाचा समावेश होता .
पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी श्री दिनकर ठोसरे यांचे प्रमुख उपस्थितीत सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी , पोलीस कर्मचारी तसेच तामीळनाडू राज्याच्या पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.

सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असून पहील्या टप्प्यातील निवडणुक १९ एप्रील आहे तसेच १७ एप्रील रोजी राम नवमी उत्सव आहे . सण व लोकसभा निवडणूक अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणताही अनुचित घटना घडू नये , शांतता – सुव्यस्था कायम रहावी राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौदार्य वृद्धींगत व्हावा या उद्देशाने पोलीस विभागाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला . त्यावेळी सिंदेवाही पोलीस अधिकारी , कर्मचारी व तामीळनाडू पोलीसांचे विशेष पथक उपस्थित होते .