नोंदणीची अट रद्द करा व सरळ सरळ सर्वसामान्य नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावे.

53

नोंदणीची अट रद्द करा व सरळ सरळ सर्वसामान्य नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावे.

स्थानिक स्तरावर लस उपलब्ध करून द्या; राळेगाव तालुका  परिसरातील नागरिकांची मागणी.

नोंदणीची अट रद्द करा व सरळ सरळ सर्वसामान्य नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावे.
नोंदणीची अट रद्द करा व सरळ सरळ सर्वसामान्य नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावे.

साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
यवतमाळ/राळेगाव:- तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना लस घेण्यासाठी ऑनलाईन सेल्फ रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. नोंदणीची माहिती अनेकांनकडे अँड्रॉइड मोबाईलचा  अभाव असल्याने परिसरातील नागरिक लसीपासून वंचित आहे . या गर्दी मुळे कोरोना संक्रमणाची धास्ती व्यक्त होत असून 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधेप्रमाणे 18 ते 44 वयोगटातील तरुणांना स्थानिक स्तरावर विना रजिस्ट्रेशन लसीकरनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राळेगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांन कडून होत आहे.

स्थानिक नागरिकांना  नोंदणीशिवाय लस मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शासन प्रशासनाच्या घोरणाविरुद्ध नागरिकांत असंतोषाची भावना व्यक्त होत आहे. तर स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. नोंदणी करून येणारे नागरिक बाहेरील तालुक्यातील मोठया प्रमाणात येत आहे. यावेळी एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास इतरांना संसर्ग होण्याची शक्यता आहे

राळेगाव तालुका परिसरातील तरुणांनमध्ये लसीकरणाची इच्छा आहे. परंतु शासनाच्या विरोधाभासी निर्णयामुळे तरुणांन मध्ये नाराजींचा सुर  दिसून येत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने 45 वर्ष वयोगटातील नागरिकांप्रमाणे 18 ते 44 वयोगटासाठीही नोंदणीची रद्द करून सरळ -सरळ मागेल त्याला कोरोना लस उपलब्ध करून देण्याची मागणी राळेगाव तालुक्यातील नागरिकांन कडुन होत आहे.