गडचिरोली जिल्ह्यात 416 कोरोनामुक्त, 8 मृत्यूसह 240 नवीन कोरोना बाधित.
✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.16 :- आज जिल्हयात 240 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 416 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27342 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 24038 वर पोहचली. तसेच सद्या 2681 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 623 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
आज 8 नवीन मृत्यूमध्ये 62 वर्षीय पुरुष रामपूरी वार्ड गडचिरोली, 72 वर्षीय पुरुष आमगाव ता.वडसा, 55 वर्षीय पुरुष व्याहाळ ता.सावली.जि.चंद्रपूर, 87 वर्षीय पुरुष राजेन्द्र वार्ड ता.वडसा, 70 वर्षीय पुरुष पालोरा ता.आरमोरी, 40 वर्षीय पुरुष देयोपायली ता. नागभीड जि.चंद्रपूर, 45 वर्षीय पुरुष येंनगला ता.आरमोरी, 37 वर्षीय पुरुष गट्टा ता.एटापल्ली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.92 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 9.81 टक्के तर मृत्यू दर 2.28 टक्के झाला.
नवीन 240 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 72, अहेरी तालुक्यातील 37, आरमोरी 18, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 42, धानोरा तालुक्यातील 10, एटापल्ली तालुक्यातील 05, कोरची तालुक्यातील 03, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 5, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 16 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 22 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 416 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 141, अहेरी 30, आरमोरी 44, भामरागड 17, चामोर्शी 47, धानोरा 20, एटापल्ली 17, मुलचेरा 09, सिरोंचा 38, कोरची 04, कुरखेडा 28 तसेच वडसा येथील 21 जणांचा समावेश आहे.