वडनेर ग्रामीण रुग्णालय येथे कोविड सेंटर सुरु करा: माजी आमदार तिमांडे यांची पालकमंत्राकडे मागणी.

प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी✒
हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर ग्रामीण रुग्णालय येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मागणी केली होती. त्याअनुशंगा आज पालकमंत्री सुनील केदार यांनी रुग्णालयांची पाहणी केली.

ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे पालकमंत्री सुनील केदार यांनी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली सोबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे उपस्थित होते .त्यावेळी डॉक्टर यांच्यासोबत चर्चा करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत तसेच ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरु करण्याबाबत 05 मे 2021 ला माजी आमदार प्रा.राजू तिमांडे व सरपंच कविता वानखेडे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना मागणी केली होती.

त्यानिमित्त वडनेर येथे जाऊन ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करतेवेळी लवकरात लवकर कोविड सेंटर सुरु करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. त्यावेळी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, सरपंच कविता वानखेडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, उपसरपंच सुभाष शिंदे, संजय भोयर, सुनील कळस्कर, गजानन तागडे, दसरथ दुर्गे, सुनील मून, घनश्याम भगत,चंद्रशेखर ब्राह्मणे, आरिफ शेख तसेच वडनेर ग्रामवासी इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here