महाज्योती शिष्यवृत्ती च्या ढिसाळ कारभारामुळे phd विद्यार्थ्यांनी शिक्षणास मुकावे का?

57

प्रा. अक्षय पेटकर, प्रतिनिधी✒
मुंबई:- ओबीसी पीएचडी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरच ओबीसी मंत्री विजय वडडेट्टीवार व संचालक श्री डांगे यांचे सतत मौन राहण्याची भूमिका कधीपर्यंत ? ओबीसी मंत्री वडेट्टीवार यांच्या अश्वासनावर विश्वास ठेऊन रात्रंदिवस अभ्यास करून आम्ही Ph.D पर्यंत आलो पण कोरोनाच कारण देऊन आमचं घोंगड गेल्या दोनवर्षापासून असच भिजत ठेवलंय. त्यातच परत नोंदणीचे वय, अतिशय कमी शुल्क व 150 जागाची निवड अश्या महाज्योतीच्या काळ्या नियमामुळे मानसिक खच्चीकरण होत असलेल्या विद्यार्थ्यांनी आता शिक्षनास मुकावे का? कोरोनाच्या परिस्तिथीत 8 जुलै 2020 रोजी मा.धनंजय मुंडे साहेबांनी 408 विद्यार्थ्यांना बार्टी ससंस्थेमार्फत सरसकट शिष्यवृत्ती जाहीर केली तर मग मा. वडेट्टीवार साहेब ओबीसी मंत्री असून कोरोनाला पाठीशी का घालत आहे?जागा व शुल्क बाबत ओबीसी phd विद्यार्थ्यांच्या बाबत ठोस भूमीका घेण्यात ओबीसी मंत्री एवढे मागे कसे ? शिष्यवृत्ती संदर्भात तर राजकारण होत नाही ना ? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. शिष्यवृती मधील प्रश्न सोडवन्यासाठी मा. मंत्री वडेट्टीवार साहेब यांनी वरील गोष्टीच गांभीर्य लक्षात घेऊन विध्यार्थी हा या राष्ठ्राचा केद्रबिंदू असून विद्यार्थ्यांच हित प्रथम असल्याची भूमिका घेणार की नाही?

सचिन धारे
आचार्य पदवी धारक विद्यार्थी व.ना.म कृ.वि.,परभणी.