नागपूर मध्ये घडला इतीहास, भंगार बिल्डींग मध्ये तयार झाले 15 दिवसांत सुसज्ज रुग्णालय.

✒️युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒️
नागपूर :- नागपुरात अनेक वर्षापासुन धूळीत पडलेल्या भंगार असलेल्या बिल्डींग मध्ये आरोग्यदायी संस्थेने अवघ्या 15 दिवसांत एक अशी सुसज्ज रुग्णालयाची उभारणा करुन नागपुरचे नाव भारतभर गाजवल आहे.
देशा आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात उपराज्यधानी मध्ये रोज हजारो कोरोना वायरस बाधित रुग्णांची भर पडत आहे. कोरोना महामारीच्या काळात खडतर परिश्रम करून जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी अवघ्या 15 दिवसांत सुसज्ज असे कोविड रुग्णालय उभे करण्याची इतिहासातील पहिलीच घटना नागपुरात घडली आहे.
भारताचे क्रेंद्रस्थानी असलेल्या नागपुरात 1970 च्या काळात गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दर्जाचे होते. 2012 मध्ये हे रुग्णालय बंद पडल्याचे ऐकिवात आहे. मात्र, त्यापूर्विपासूनच येतील आरोग्य सेवा घरघर करीत होती. जिल्ह्यातील साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना झाला. यातील 30 टक्के लोकांना रेमडेसिव्हिर, स्टिराईडवरील उपचार झाले. यामुळे अशा कोरोनामुक्त रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजारांसह हृदय, फुफ्फुस, किडनी, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडित अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचे पुढे येत आहे. या आजारांवरील रुग्णांना येथे शासकीय दरातून उपचार मिळतील, असा विश्वास डॉ. दंदे फाउंडेशनतर्फे देण्यात आला आहे.
धरमपेठेतील नागरिक सहकारी रुग्णालयापूर्वी शासनाचे स्टोअर रूम होते. येथे रुग्णालय मंजूर झाल्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासने ही जागा लिजवर दिली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अर्थसहाय केले. 1965 ते 1970 च्या काळात 42 खाटांचे धर्मादाय तत्त्वावरील रुग्णालय तयार झाले. नाशिकराव बाळासाहेब तिरपुडे या संस्थेचे अध्यक्ष राहिले होते. डॉ. बालचंद्र खांडेकर अजूनही या समितीवर आहेत.