गरजु लोकांना सुधीर कोठारी तर्फे अन्न धान्याचे वाटप.
✒आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
हिंगणघाट:- गरजूंना एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या तर्फे हिंगणघाट शहरातील नाभिक समाजातील गरजवंताला किराणा सामान किटचे वाटत करण्यात आले.
ज्यांचे लाॅकडाऊन मुळे व्यवसाय बंद असल्याने त्याची अवहेलना सुरु झाली होती त्याबाबत नाभीक समाजातील एका सद्दशाने राम अंबरवेले यांनी उध्दभवलेल्या परिस्थितीमुळे आर्थिक मदतीची गरज आहे अशी पोस्ट केली होती.
त्यावर प्रतीउत्तरार्थ सुधीर कोठारी यांनी संपर्क साधावा नख्खीच मदत करु असे प्रतिपादन केले होते. आणि त्यांनी ते लगेच 30 गरीब व गरजू कुटुंबातील नागरीकांना जिवनाश्यक वस्तुंचे (किराणा माल किट) घेऊन दिले त्यामुळे गोरगरिबांच्या चेहर्यावर स्मित हास्य उमटले आहे. त्यांनी सुधिर कोठारी यांचे आभार आहे मानले.