आम आदमी पार्टी तर्फे सदस्य नोंदणी अभियान
विठ्ठल ममताबादे
उरण तालुका प्रतिनिधी
मो. नं. 9702751098
उरण (रायगड ):-आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा प्रचार व प्रसार करण्याच्या व पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून उरण तालुक्यात आम आदमी पार्टीतर्फे सदस्य व कार्यकारिणी सभासद नोंदणी अभियान सुरु आहे.अनेक व्यक्ती आम आदमी पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आम आदमी पक्षाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून ज्या व्यक्तींना आम आदमी पार्टी जॉईन करायचे आहे किंवा पक्षाचे सदस्य व्हायचे आहे त्यांनी आम आदमी पार्टीचे उरण विधानसभा मतदार संघ 190 चे तालुकाध्यक्ष संतोष भगत संपर्क क्रमांक 9969326612 , 8879476655 यांच्याशी संपर्क साधावे. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून पक्ष अधिक मजबूत करावा असे आवाहन आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आले आहे.