दोन दिवसात पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपींना ठोकल्या बेड्या
मीडिया वार्ता न्यूज
१६ मे, २०२२: मुंबईतील धारावीमधील १९ वर्षीय महिलेच्या बलात्काराप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी या दुर्घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असल्याची पीडित महिलेने माहिती दिली होती. त्यानंतर तातडीने तपास सुरू करत पोलिसांनी दोन दिवसातच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पिडीत महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत दोन अल्पवयीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवत घरात प्रवेश केला. यावेळी ओळख लपवण्यासाठी त्यांनी तोंडावर कपडा गुंडाळला असल्याने, आरोपींचा तपास करण्यात पोलिसांना मोठा अडथळा येत होता.
परंतु गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी आपली यंत्रणा त्वरित कार्यरत केली. धारावी आणि परिसरातील सीसीटीव्हीं कॅमेराचा वापर करून संशयित आरोपींचा तपास करण्यात आला. यादरम्यान विले पार्लेचे रहिवासी असलेले पण कामानिमित्त धारावीला असणाऱ्या दोन संशियत युवकाची चौकशी केली असता, त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सदर गुह्यात आरोपींना २३ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सविस्तर विडिओ पाहण्यासाठी भेट द्या: https://fb.watch/d32DsRNgO_/
या गुन्ह्याची उकल करण्यात डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त, प्रणय अशोक, पोलिस उपायुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत पाटील तसेच धारावी आणि आजूबाजूच्या विभागातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता.