पन्नास वर्षाआधी पूर्वजांनी बांधलेल्या “बुध्द विहाराचा जीर्णोद्धार”कार्यक्रम उत्स्फूर्तपणे संपन्न..

गुणवंत कांबळे

मुंबई प्रतिनिधी

मो. नं.९८६९८६०५३०

तालुका, जिल्हा रत्नागिरीमधील गाव मौजे हरचिरी गावामध्ये प्रथमच “श्रामणेर प्रवज्जा शिबीर” संपन्न झाले.

निमित्त होत पन्नास वर्षाआधी पुर्वजांनी बांधलेल्या ‘बुध्द विहाराचा जिर्णोध्दार’.बुध्द विहार बौध्दजन सेवा संघ, हरचिरी ह्या संघटना मार्फत गावातील प्रत्येक गावकरी आणि शहरी भागातील चाकरमान्यांनी काटकसर करून कष्टाचा एक एक पैसा जमा करून बुध्द विहार उभे करण्याचा एकमताने निर्णय घेऊन दोन वर्षाच्या कालावधीत वर्ष २०२३ च्या एप्रिल महिन्यापर्यंत एकजूटीने प्रयत्न करत होते. दरम्यान बुध्द विहारात साजेशी बुध्द मुर्ती आणणेही आवश्यक होते. यासाठी कर्नाटक राज्यातील बुध्दीस्ट इंटरनॅशनल स्कुलचे प्रमुख महाथेरो भदन्त धम्मनाद यांनी थायलंड देशाशी संपर्क साधून तेथील श्रध्दावान साधकांकडून ध्यानस्थ मुद्रेतील साडेपाच फुटाची पंचधातूची मुर्ती दान करण्याचे प्रयोजन केले. ह्या बुध्द रुप मुर्तीचे दि. १३ मे २०२३ रोजी”चांदेराई ते हरचिरी दरम्यान शांतीचा संदेश देणा-या बुध्द धुन व्दारे धम्मरॅली काढत पंचक्रोशीतील प्रत्येकाला, रस्ताने येणा-या प्रत्येकाला पेढे वाटून शिस्तबध्द पध्दतीने गावात आणली गेली. 

परंतु, नुसते बुध्द विहार बांधण्याबरोबरच बौध्द धम्माची संस्कृती रुजविणे आधुनिक काळातील गरज ओळखून बुध्द विहार बौध्दजन सेवा संघ, हरचिरी संघटना व्दारे ‘भन्ते धम्मानंद’ यांच्या मार्गदर्शनाखाली हरचिरी गावामध्ये प्रथमच “श्रामणेर प्रवज्जा शिबीर” भरवून हरचिरी गावात ऐतिहासिक घटना निर्माण झाली.

श्रामणेर भिक्खू संघाची पहाटे पासून सायंकाळी आवश्यक यथायोग्य सेवा संघटना पदाधिकारीसह गावकरी सेवा देत होते. ह्या सर्व घटनांचा शेवट आणि अनेकांची आतुरता असलेले “बुध्द विहाराचा उद्घाटन सोहळा आणि मुर्ती प्रतिष्ठापना”दि. १४ मे २०२३ रोजी कर्नाटक राज्यातील महाथेरो भदन्त धम्मनाद यांच्या सह श्रामणेर भिक्खू संघा सह संपन्न करत पंचधातूय बुध्द रुप मुर्तीची प्रतिष्ठापना आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्ती अनावरण करण्यात आले. 

एक स्वप्न सत्यात उतरवताना अनेक जण ह्यावेळी भावुक झाले होते. 

ह्यानंतर दिलेल्या योगदानाबद्दल लहानथोर सर्व मान्यवरांचा सत्कार करून श्रध्दापुर्वक श्रामणेर प्रवज्जा शिबीरातील सहभागी श्रामणेर संघाला बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथासह गौरव पत्र बहाल करत बौध्द विधीपुर्वक श्रामणेर प्रवज्जा शिबीराचा सांगता समारोप संपन्न झाला. 

असे ऐतिहासिक क्षण आधुनिक काळातील गरज आहे. संघटनांची समविचारी एकजुट, सुनियोजित व्यवस्थापन आणि बौध्द धम्माची आस्था ह्यातूनच आदर्श समाज घडत असतो. म्हणून नुसते बुध्द विहार बांधून त्यामध्ये सभा, संस्कार विधी आणि बुध्द वंदना बरोबरच धम्माचे संस्कार (श्रामणेर प्रवज्जा, विपश्यना साधना, वास्तविक परिस्थिती नुसार प्रशिक्षण शिबीर) होणे, आवश्यक आहे, ज्यामुळे एक आदर्श, सज्जन, विवेकधारी नागरीक तयार होतो.

बुध्द विहार बौध्दजन सेवा संघ, हरचिरी संघटना मार्फत बुध्द विहार जिर्णोध्दार सह श्रामणेर प्रवज्जा शिबीर असे उपक्रम राबवित असताना एका ऐतिहासिक घटनाचे साक्षीदार प्रत्येक गावकरी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here