एमआयडीसी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीला अटक 

त्रिशा राऊत

नागपूर ग्रामीण प्रतिनिधी

मो 9096817953

नागपूर उपराजधानीतील एमआयडीसी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.आरोपीने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अंकित उर्फ ​​प्रज्वल हिरालाल पाटील (वय 20, एमआयडीसी) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अंकितने प्रथम एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेच्या १३ वर्षीय मुलीला आपल्या प्रेमात अडकवले. १२ मे रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपीने मुलीला एमआयडीसी परिसरातील पाण्याच्या टाकीवर नेले. त्याने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पण मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील आरोपीने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. कोणाला काही सांगितल्यास आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. 

दरम्यान, मुलगी तेथून घरी गेल्यावर तिची प्रकृती बिघडली. तिच्या आई-वडिलांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, मुलीने आपला त्रास कथन केला. यानंतर कुटुंबीयांनी थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनीआरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here