परराज्यातील बोगस बियाणे विक्रीवर बंदी घाला: मनसेने दिला आंदोलनाचा ईशारा

✒साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
राळेगाव(यवतमाळ):- परराज्यातील बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकुन त्यांचे आर्थिक नुकसान तर केले जात आहेत शिवाय या बोगस बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याने परिणामी शेतकऱ्यांना नापिकीला तोंड द्यावे लागुन आर्थिक विवंचनेत सापडून शेतकरी आत्महत्या करीत आहेत त्यामुळे परराज्यातील बोगस बियाण्यांना जिल्ह्यात विक्रीसाठी बंदी घालुन बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा ईशारा उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट, मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे, मनवासे तालुकाध्यक्ष आरिफ शेख, तालुका उपाध्यक्ष गणेश काकडे, मंगेश तोडसे ,अमोल गेडाम, भूषण फरकाडे, पवन पचारे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.