पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या किंमती तात्काळ कमी करा:विदर्भ राज्य आंदोलन समिती
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुकेश ठाकूर यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निवेदन

प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
वर्धा:- पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पण या लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक बेरोजगार झाले, तसेच अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. या सर्व गोष्टींचा विचार सरकारने करणे गरजेचे होते पण सरकारने तसे न करता चक्क पेट्रोल, डिझेल भरपूर वाढ करून चक्क ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचवली आहे. समजा एक लिटर पेट्रोल १०० रुपयाला असेल तर त्यापैकी जवळपास ६४ टक्के कर असतो यात केंद्राचा आयात शुल्क आणि राज्य सरकारचे लागू केलेले व्हॅट यांचा समावेश असतो. १०० रुपयांच्या पेट्रोलचा ६४ टक्के कर वजा केला. पेट्रोलची किंमत होते ३६ रु. त्यातही डीलर्सचा वाटा असतो. तसेच ६४ टाक्यांमध्ये केंद्राचा ४० टक्के व राज्याचा २४ टक्के कर वाटा असतो. या दरवाढीने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे बाकी इतर जीवनावश्यक बाबींच्या किंमती वाढल्या आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ त्वरित माघे घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तसेच सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देते वेळी मुकेश ठाकूर तालुका अध्यक्ष वर्धा, प्रकाश मसराम, डॉ. आशिष ठाकरे, सुनील म्हस्के, राहुल ढोक, अमित चव्हाण, अरुण गावंडे, माधुरी पझारे, नंदा प्रजापती, महेश मसराम, ओम पहाडे व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.